Breaking News

मुधोजी हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Selection of Mudhoji High School Under 17 Girls Hockey Team for State Level Tournament

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोल्हापुर येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेतील पहिला सामना इचलकरंजी म.न.पा .संघ विरुद्ध खेळण्यात आला हा सामना  ७-०  ने जिंकून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीचा सामना कोल्हापूर जिल्हा विरुद्ध झाला हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. हा सामना ३-१ जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या उपांत्य सामन्यांमध्ये निर्णायक गोल संघाची कर्णधार राष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. अनुराधा ठोंबरे हिने २  गोल नोंदवले. 

    या स्पर्धेतील अंतिम सामना कोल्हापूर म.न.पा संघविरुद्ध झाला. हा सामना ६-० ने जिंकून विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला या संघाची निवड राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी झाली. .

    या विजय संघामध्ये  फॉरवर्ड लाईन मध्ये कु. निकिता वेताळ, कु.श्रुती भोसले कु. श्रुतिका घाडगे कु. साक्षी पुजारी  यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले. हाफ  लाईन मध्ये  कु.  श्रेया चव्हाण, कु. शिफा मुलानी, कु. तेजस्विनी कर्वे व कु. श्रद्धा तांबे यांनी  चांगली कामगिरी केली तसेच बचाव फळीमध्ये कु अनुराधा ठोंबरे, कु. अनुष्का केंजळे, कु. सृष्टी जावीर, व कु. अनुष्का सपाटे  यांनी उत्कृष्ट खेळ केला.गोलकीपर म्हणून कु. अनुष्का चव्हाण हिने देखील चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

    या संघामध्ये नुकत्याच छत्तीसगड येथे झालेल्या पहिल्या वेस्ट झोन राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ब्रांझ मिळवलेले व महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केलेल्या कु. श्रेया चव्हाण, कु. शिफा मुलानी, व‌ कु. यांचा देखील समावेश होता .
या विजय संघाला सीनियर हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे सर, सचिन धुमाळ सर, क्रीडा शिक्षक खुरंगे बी.बी., व  धनश्री क्षीरसागर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

    या विजय संघास व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर, स्कूल कमिटीचे व्हा. चेअरमन रमणलाल दोशी, सदस्य शिरीष शरद कुमार दोशी, डॉक्टर पार्श्वनाथ राजवैद्य, क्रीडा समितीचे सदस्य शिरीष वेलकर ,  महादेव माने,  संजय फडतरे,  तुषार मोहिते, प्रा.स्वप्नील पाटील, प्रा. तायप्पा शेडगे तसेच मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगवणे बी एम, उप प्राचार्य  ननवरे ए वाय. ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य  देशमुख डी.एम . पर्यवेक्षक शिंदे व्ही.जी., बगाडे मॅडम , जाधव जी.ए. , प्रशालेतील सर्व शिक्षक व क्रीडा शिक्षक तसेच दि हॉकी सातारा  संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, उपाध्यक्ष सचिन लाळगे सदस्य प्रवीण गाडे, महेंद्र जाधव, माजी राष्ट्रीय खेळाडू  सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

No comments