Breaking News

मुधोजी महाविद्यालयाच्या रुचिता कदमचे जलतरण स्पर्धेत यश

Success of Ruchita Kadam of Mudhoji College in swimming competition

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : शिवाजी विद्यापीठा अंतर्गत कोल्हापूर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत येथील मुधोजी महाविद्यालयाच्या रुचिता कदम हिने पन्नास, शंभर व दोनशे मिटर बॅक स्ट्रोक तसेच पन्नास मिटर फ्री स्टाइल या प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक तर शंभर, दोनशे, आठशे मिटर फ्री स्टाइल प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यापूर्वी मेढा येथे पार पडलेल्या विभागीय जलतरण स्पर्धेतही तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.

    कोल्हापूर येथील शाहू कॉलेज येथे या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या यशाबद्दल रुचिता हीचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, प्रशासनअधिकारी अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच. कदम आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments