गुणवरे येथून पल्सर मोटरसायकलची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - गुणवरे ता. फलटण येथून बजाज पल्सर मोटर सायकलची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९/१०/२०२३ रोजी सकाळी ११.५५ ते दुपारी १२.३४ वाजण्याच्या सुमारास, गुणवरे गावच्या हद्दीत चव्हाणवस्ती रोड येथे लावलेली बजाज पल्सर मोटरसायकल क्र एम एच ११ बी एक्स ५९७१ ही काळ्या रंगाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद संभाजी मारुती गावडे रा. गुणवरे ता. फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक कदम हे करीत आहेत.
No comments