Breaking News

मतदार नोंदणी : आज व उद्या फलटण येथे विशेष मोहिम

Voter Registration: Special campaign today and tomorrow at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ - २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदार संघाअंतर्गत सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचेमार्फत सर्व सुजाण नागरिकांना व मतदारांना आवाहन करण्यात येते की, मा. भारत निवडणूक आयोगाने दि. ०१/०१/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये आगामी वर्षाच्या १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकास ज्या नागरिकांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होणार आहेत अथवा झालेली आहेत त्यांनी नमुना नं. ६ भरून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावे. सदर  पुनरीक्षण कार्यक्रमांमध्ये दि. २५ नोव्हेंबर (शनिवार) व दि. २६ नोव्हेंबर (रविवार) रोजी विशेष मोहिम राबविणेत येणार आहे. तसेच दि.०२ डिसेंबर २०२३ व दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी दिव्यांग, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर भटक्या विमुक्त जाती जमातीच्या व्यक्तींसाठी विशेष शिबीर प्रत्येक गावात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या उपस्थितीत आयोजित करणेत येणार आहे.

    तरी फलटण तालूकेतील सर्व सुजान नागरीकांना आवाहन करणेत येते की मतदान आपले प्रथम कर्तव्य समजून सक्षम लोकशाहीची पहिली पायरी म्हणून मतदार नोंदणी करणेसाठी मतदारांनी या अभियानात उत्र्फपणे प्रतिसाद दयावा. तसेच संबंधित कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांनी नव मतदार, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर भटक्या जाती जमातीतील नागरीकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी या मोहिमेमध्ये आपले प्रभावी योगदान दयावे.

    तसेच सदर पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत, मतदार नोंदणी, मतदार नोंद दुरूस्ती, मतदार यादीतून नाव इ. कामकाज करणे कामी आपले मतदार यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे सर्वांना सहकार्य करतील याशिवाय ऑनलाईन Voter Helpline मोबाईल अॅप, Voter Portal या संकेतस्थळ वरून देखील घरबसल्या हे कामकाज करता येईल.

No comments