Breaking News

कत्तलीसाठी आणलेली १३ गोवंशी जनावरे पकडली ; एकावर गुन्हा

13 cattle brought for slaughter caught; A crime against one

    फलटण फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   - कुरेशीनगर फलटण  येथे घराच्या पाठीमागील वाडग्यामध्ये जर्शी गायीची १३ खोंड, त्यामध्ये ११ जिवंत व २ मयत अशी कत्तल करण्याच्या उद्देशाने, चारापाण्याची सोय न करता दाटीवाटीने कोंबुन विनापरवाना जनावरे डांबून ठेवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १४/१२/२२०३ रोजी पोलीस निरीक्षक शेळके यांना मिळालेल्या गोपनीय खबरीनुसार, सहा. पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दातीर, पोलीस हवालदार चंद्रकांत धापते व स्टाफ असे ५.३० वाजण्याच्या   सुमारास कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण येथील झिशान इमाम बेपारी याच्या घराच्या पाठीमागे कच्च्या विटाचे वाडग्यामध्ये जावुन पाहीले असता, वाडग्यामध्ये जर्शी गायीची १३ खोंड, त्यामध्ये ११ जिवंत व २ मयत अशी मिळून आली. सदर खोंड ही कमी जागेमध्ये दाटीवाटीने डांबुन, त्यांची कोणत्याही प्रकारे चारा पाण्याची सोय न करता, सदर खोंड उपाशीपोटी मिळुन आली.

No comments