अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीवर अत्याचार ; पोक्सो - बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ - अल्पवयीन मुलींसोबत प्रेम संबंध प्रस्थपित करून, तिला तिचे अश्लील फोटो दाखवून व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत, तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबध ठेवल्याने दोघांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात दोघांवर पोक्सो, बलात्कार व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल तुळशीराम नाळे रा.फरांदवाडी ता.फलटण व सनी किशोर वाघमोडे रा. मंगळवारपेठ, फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या बाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की , सदर पीडित मुलीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वप्नील नाळे याने जून २०१९ व २३ डिसेंबर २०२३ या कालावधीत पीडित मुलीला तीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची व तिच्या भावास व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत ठिकठिकाणी नेऊन तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्याचबरोबर तुमची आमच्या बरोबर लग्न करण्याची लायकी नाही असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली. सनी वाघमोडे याने तू स्वप्नीलला भेटायला जा अन्यथा तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली. सदर मुलीच्या फिर्यादीवरून संबंधित संशयितांवर पोक्सो, बलात्कार व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस हे करीत आहेत.
No comments