Breaking News

गोतस्करी करणाऱ्यांच्यावर कारवाई ; ६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

Action against divers; 6 lakh worth of goods seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - बरड भागात फलटण ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी लावली असताना, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिकअप टेम्पोमध्ये ५ जर्सी गाई दाटीवाटीने भरून नेत असताना दोन युवक सापडले. फलटण ग्रामीण पोलिसांनी या गो तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत, एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन,  ५ गाईंची राजाळे येथील गोशाळेत रवानगी केली आहे.

    पोलीस अधीक्षक समीर शेख ,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल ,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यास सक्त आदेश दिलेले आहेत की, कोणत्याही प्रकारे गो हत्येसाठी गो तस्करी होणार नाही, यासाठी सतत मोहिमा राबवून आरोपींवर कारवाई करावी. तसेच प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरपणे वागवण्याचा कायदा अनुसार होणारे कारवाईला अग्रक्रम देवून गुन्हे दाखल करा अशा सूचना आहेत.या सूचनांच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विशेष नाकाबंदी सुरू केलेली आहे. 

    बरड भागात या कायद्यान्वये कारवाईबाबत सतत फोन येत असतात, त्या ठिकाणी रात्री साधे कपड्यांमध्ये नाकाबंदी लावण्यात आलेली होती. रात्री पहाटे साडेतीन वाजता साठे फाटा या ठिकाणी पिकप टेम्पो एम एच १० ए क्यू ७९५० या गाडीमध्ये पाच जर्सी गाय दाटीवाटीने क्रूरपणे भरलेल्या होत्या. सदर गाई पाहता क्षणीच कत्तलीसाठी जात आहेत हे दिसून आले. त्या ठिकाणी चालक हर्षद जैनुद्दीन काजी वय २४ वर्षे राहणार नेवसेवस्ती, बारामती व त्याला मदत करणारा अफ्ताब मुबारक पठाण वय २२ वर्ष मोरगाव रोड खंडोबा नगर, बारामती या दोघांनाही पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. पाच जर्सी गाईंची त्या ठिकाणी तात्काळ सुटका करण्यात आली, दोन लाखांच्या तस्करीसाठी जाणाऱ्या जर्सी गाई व वाहतूक करणारा चार लाखाचा वरील क्रमांकाचा टेम्पो पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींसह ताब्यात घेतला व दोन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात आणून त्यांना अटक करण्यात आली तसेच जर्सी गाई या राजाळ्यातील गोशाळेत सोडण्यात आल्या.

    यानंतर अचानक पणे अशा नाकाबंदी लावून कारवाई करण्यात येणार आहे, सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार चांगण साबळे, अभंग काकडे, सोमनाथ टिके  यांनी केलेली आहे. पोलीस शिपाई सोमनाथ टिके यांनी सरकारतर्फे पोलीस ठाण्यास फिर्याद देऊन गुन्हा क्रमांक १६६९ /२३ प्राणी संरक्षण अधिनियम १९६० कलम पाच ए बी व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याचा अधिनियम कलम ११ तसेच वाहतूक कायद्याच्या कलमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments