कृषिमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह
Agriculture Minister Dhananjay Munde Corona positive
गंधवार्ता वृत्तसेवा दि.२४ - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील ४ दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत असून. काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.
नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता, पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील ४ दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.
मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल... सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर केले आहे.
No comments