श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवकांचे आशास्थान युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन मंगल येथे दुपारी १ वाजता करण्यात आले आहे.
यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून, श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, तरी इच्छुक रक्तदात्यांनी व फलटण तालुक्यातील सर्वे गरजू व्यक्तीने आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments