Breaking News

रास्तभाव दुकानांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Call for applications for Fair Price Shops

    सातारा दि. 29 (जिमाका) : सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली, व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता मंजुर करण्याच्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी जाहीरनामा प्रसिध्द करणेत येत आहे तरी, कागदपत्रासह तहसिलदार यांच्याकडे अर्ज करावेत.

    यामध्ये, सातारा तालुका - गावे 12 व शहरी भागातील ठिकाण -01, वाई तालुका – गावे 17 व शहरी भागातील ठिकाण 01 तसेच  कराड तालुका गावे- 07 ,  महाबळेश्वर तालुका-45,  खंडाळा तालुका -08, कोरेगाव तालुका -13,  खटाव तालुका-07,  फलटण तालुका - 05 अशा एकूण-116 गावे / ठिकाणांचा समावेश आहे. याकरीता संबंधित तालुक्यांचे तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करणेचा कालावधी दि.1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 अखेर ( सुट्टीचे दिवस सोडून) असा निश्चीत करणेत आला आहे. तरी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरीता ज्यांना अर्ज करणेचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे आवाहन मा.जिल्हाधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

No comments