सातारा जिल्ह्यात कोरोना ; पुसेगावमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ - कोरोनाने पुन्हा एकदा राज्यात शिरकाव केला असून आता सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव केला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.
अनेकदा प्रशासनाने अनेक नियमावली जाहीर करत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पुन्हा एकदा गेल्या काही दिवसापासून कोरोनाने डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात पुसेगाव येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोरोना रूग्ण आढळल्याने लोकांनी भीती बाळगू नये तर सूचनाचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Post Comment
No comments