Breaking News

धनगर आरक्षणासाठी एल्गारः महामार्गावर चक्काजाम, खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Elgar for Dhangar Reservation: Jams on the highway, long queues of vehicles at Khambatki Ghat

    सातारा - धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यातील समाजबांधवांनी आंदोलनाचा नारा दिला. राज्यस्तरीय आंदोलनाचा निर्धार खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटातून केला गेला. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन न थांबविण्याचे आरक्षण लढा समितीच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे खंबाटकी घाटातून धनगर आरक्षणाचा नारा घुमला. सुमारे दीड तास महामार्ग रोखल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

    धनगर आरक्षण लढ्याची सुरुवात लढ्याचे जनक बी. के. कोकरे यांनी ३४ वर्षांपूर्वी खंबाटकी घाटात मशाल पेटवून केली होती. या घटनेचे औचित्य साधून धनगर समाज आरक्षण लढा समितीने आंदोलनाचा मार्ग निवडला. खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हे पिवळं वादळ महामार्गावर धडकलं.

    धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी गेली अनेक वर्ष मागणी केली जात आहे. खंडाळा तालुक्यातील समाज बांधवांनी काही वर्षापूर्वी साखळी उपोषण केले होते. मात्र शासन पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

No comments