३१ डिसेंबर २००५ पूर्वी जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मतदार हवा - प्रांताधिकारी सचिन ढोले
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५५ फलटण ( अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावतीकरण मोहीम मतदार संघात सुरू आहे. फलटण विधानसभा मतदारसंघातील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंदणी करावी आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा, दि. ३१ डिसेंबर २००५ पूर्वी जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मतदार हवा असे आवाहन प्रांताधिकारी तथा फलटण विधानसभा मतदारसंघ मतदान नोंदणी अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
फलटण विधानसभा (अ. जा.) मतदार संघातील मतदार यादी अद्ययावतीकरणाचे कामाचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी धुमाळवाडी येथे भेट दिली. याप्रसंगी धुमाळवाडी येथे मतदार यादीचा सर्व्हे केला व मयत मतदार वगळणी आणि नवीन मतदार नोंदणी केली. तसेच नाव नोंदणी पासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची काळजी मतदार यादी नोंदणी करताना घ्यावी, अजूनही काही मतदारांची नावे मतदार यादीत नोंदवायची राहिली आहेत असे मतदार नोंदणी अधिकारी तथा फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
ज्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा युवक/ युवती, तृतीय पंथी, नवविवाहिताच्या नावांचा समावेश करावा तसेच मयत आणि स्थलांतरिताची नांवे वगळणे, ही कामे काळजीपूर्वक करावीत असे सांगितले.
No comments