Breaking News

फायनान्स कंपनी व कृषि सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक ; मार्केट कमिटी गांभीर्याने लक्ष घालणार - श्रीमंत रघुनाथराजे

Fraud of farmers by finance companies and agricultural service centers; Market Committee will pay serious attention - Raghunathraje

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.०५ डिसेंबर -फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून शेतीविषयक साहित्य उधारीवर खरेदी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या नावावर फायनान्स कंपनीचे कर्ज प्रकरणे लादून, त्यांना थेट वसुलीची नोटिस आल्यानंतर हवालदिल झालेला शेतकरी यांना थेट कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण येथे जाऊन श्रीमंत रघुनाथराजे  फसवणुकीची माहिती दिल्यानंतर  फसवणुक करणाऱ्या सर्व संबंधितांवर कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाईची पावले उचलण्यात येत असुन, सर्व संबंधित शेतकऱ्यांना सदर प्रकरणी दिलासा मिळवुन देणार असल्याची ग्वाही समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

    केअर इंडिया फिनवेस्ट लि. फरिदाबाद, हरियाणा व फलटण तालुक्यातील काही कृषि सेवा केंद्राचे डिलर्स यांच्या माध्यमातुन उधारी, निविष्ठा खरेदी विक्रीचे लक्षांक पुर्ण करणे, शेतकऱ्यांची संमती न घेता ऑनलाईन कर्जपुरवठा करणे या सर्व बाबींबद्दल फलटण तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाकडे रितसर तक्रार दाखल केल्यानंतर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधित शेतकरी व कृषी सेवा केंद्र चालक यांना बोलवून घेऊन सदर फसवणुकी बाबत माहिती घेतली. 

    यावेळी पंचायत समिती, फलटण चे गटविकास अधिकारी श्री.चंद्रकांत बोडरे, कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण चे सचिव श्री.शंकरराव सोनवलकर, पंचायत समिती, फलटण चे कृषि विस्तार अधिकारी श्री. आप्पासाहेब गौंड, तक्रारदार शेतकरी आणि पत्रकार बंधु उपस्थित होते. 

    याप्रसंगी शेतकऱ्यांचे म्हणणे व कृषि सेवा केंद्राचे डिलर यांचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर आणि शेतकऱ्यांना आलेल्या सिटी सिव्हील अँड सेशन कोर्ट मुंबई-३२ च्या नोटीसाची खातरजमा केल्यानंतर, शेतकऱ्यांची खुप मोठ्या प्रमाणावर फसवणुक झाली असल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणुन दिले. 

    शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणूक प्रश्न निकाली काढण्यासाठी, फलटण तालुक्यातील सर्व डिलर्स, पंचायत समितीचा गुण नियंत्रण विभाग व तालुका कृषि अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव, सहायक निबंधक, सह,संस्था,फलटण,तक्रारदार शेतकरी, फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ बोलविणेत येत असलेबाबतची माहिती समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी दिली.

    तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणुक झाली असुन याबाबतीत फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत रामराजे शेतकरी समस्या निवारण कक्षाने योग्य ती दखल घेतली असुन फसवणुक करणाऱ्या सर्व संबंधितांवर कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाईची पावले उचलणेत येत असुन सर्व संबंधित शेतकऱ्यांना सदर प्रकरणी दिलासा मिळवुन देणार असल्याची ग्वाही समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे यांनी दिली.

No comments