Breaking News

राजमाता सईबाई स्मृतीस्थळासाठी २९.७३ कोटीच्या विकास आराखड्यास शासनाची मान्यता

संग्रहित छायाचित्र
Government approves 29.73 crore development plan for Rajmata Saibai Memorial

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ डिसेंबर -  राजगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येत असलेल्या राजमाता सईबाई स्मृतीस्थळास प्रस्तावित रूपये २९.७३ कोटीच्या विकास आराखड्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. राजमाता सईबाई स्मृतीस्थळासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांच्या प्रयत्नातूनच स्मृतिस्थळासाठी २९.७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता सईबाई यांच्या स्मृतीस्थळाच्या विकास आराखड्यास शासनाच्या नियोजन विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने विकास आराखड्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यास नियोजन विभागाकडून मान्यता देण्यात आली असून २९.७३ कोटींचा निधी आज मंजूर केला आहे. 

    फलटण राजघराण्यातील असलेल्या राजमाता सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी व छत्रपती संभाजीराजेंच्या आई होत्या. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता सईबाई यांच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी विश्वस्त संस्थेकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती. या विकास आराखड्यांतर्गत कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांची 'संनियंत्रण अधिकारी' म्हणून नियुक्ती केली आहे.

    “राजमाता सईबाई स्मृतीस्थळ विकास आराखडा ”  पुरातत्व विभागाकडील कामांचा तपशील (रु.२९.७३ कोटी.)

    १ उर्वरित ठिकाणी पुनउत्खनन करणे - ४० लक्ष रुपये,२ उत्खननात प्राप्त अवशेषांचे जतन / दुरुस्ती करणे - १०० लक्ष रुपये, ३ सरदहू अवशेष पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी वाडा सदृश छत निर्माण - ३०० लक्ष रुपये, ४ वाड्याच्या तटबंदीची दुरुस्ती / पुर्णबांधणी करणे - लक्ष रुपये, ५ लँडस्केपिंग करणे - १५० लक्ष रुपये,६ वाड्याच्या प्रतिकृती तयार करणे - ३०० लक्ष रुपये, ७ डिजीटल संग्रहालय निर्माण करणे ३२५ लक्ष रुपये, ८ पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा - १०० लक्ष रुपये, ९ विद्युतीकरण / प्रकाश व्यवस्था - १८० लक्ष रुपये, १० जीएसटी  १८% - ३८६.००लक्ष रुपये, ११ आर्किटेक्ट ३% -  ६४.३५ लक्ष रुपये, १२ भाववाढ १०% - २१४.५ लक्ष रुपये, १३ रॉयल्टी इन्शुरन्स  व इतर खर्च २% - ४२.९० लक्ष रुपये, १४ भूसंपादन १२०.६५
लक्ष रुपये. एकूण २९७३.४० लक्ष रुपये.

No comments