कृषी क्षेत्राला गगनभरारी देणारे मिसाईल : सचिन यादव
(गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ - संघर्ष आणि जिद्द या शब्दांना प्रत्यक्षात झुंज देण्याची वेळ जिगरबाज व्यक्तींच्या नशिबात पावलोपावली लिखित असते. या संघर्षाला न डगमगता जे व्यक्ती खंबीरपणे स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करत असतात त्यांच्या यशाचा आदर्श इतिहास देखील इतरांना देत असतो. होय, असेच आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र अथक प्रयत्नांची जोड देऊन आज कृषी क्षेत्रात आदराने अधोरेखित करून घेतलं जाणारा सोनेरी नाव म्हणजे श्री. सचिन यादव सर!
संघर्षयोध्याचा प्रवास हा नेहमीच संघर्षाच्या वाटेनेच प्रवाहित असतो, या प्रवाहात खूप वेळा वाटेला येतात त्या म्हणजे वेदना. असाच वेदनादायी प्रवास सरांच्या नशिबी होता.मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शिरवली ता. बारामती येथे 24 डिसेंबर 1977 यांचा जन्म झाला, कि जे बारामती आणि फलटण तालुक्यासाठी एक जणू सोनेरी स्वप्न! ज्या प्रमाणे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याचप्रमाणे त्याच बालपणाच्या पाळण्यात सरांना संघर्षाचे बाळकडू रोज भेटत होते कारण वडिलांचा शेती व्यवसाय. शेती करत असताना शेतकऱ्यांना बसणाऱ्या चटक्यांची जाणीव त्यांना आपसूकच लहान वयातच जाणवली होती. महात्मा गांधी बालक मंदिर, बारामती येथे प्राथमिक, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात महाविद्यालयीन, मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कृषी कॉलेज, पुणे इथे पूर्ण करत असताना शेतीतून निघणारे तुटपुंज्या उत्पन्नावर शैक्षणिक जीवनाची घडी बसवत असताना कराव्या लागलेल्या कसरतीच्या जखमा वेळोवेळी वेदना आणि भविष्यात कराव्या लागणाऱ्या कार्याची दिशाच जणू स्पष्ट करत होते. तत्पूर्वी महाविद्यालयीन शिक्षण बारामतीला घेत असतानाच बारामतीमधील प्रमुख हॉटेल व्यावसायिकांना घरचा पशुपालनाचा जोडधंदा असल्यामुळे दुधाचा पुरवठा घरूनच केला जात होता. त्यामुळे व्यवसाय हा एक स्पष्ट मार्ग त्यांच्या समोर होता. महाविद्यालयीन शिक्षण कृषी कॉलेज, पुणे इथे पूर्ण करत असतानाच बेबीकॉर्न या दोन पिकाशी 1994 - 95 साली पासूनचा निकटचा संपर्क होता. शिक्षणाचा संदर्भ पाहिला तर शेती हाच त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे महाविद्यालयीन कालावधीत कृषी संबंधीत शेतकरी उपयोगी विविध यशस्वी प्रयोगही त्यांनी केले. शैक्षणिक टप्पा पार पडल्यानंतर सरांनी कारकिर्दीला सुरुवात केली ती डी. वाय. पाटील ट्रस्ट द्वारे कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापुर येथे नेहमीच नवनवीन कृषितंत्र शिकण्याची ओढ त्यांना कधीच शांत बसू देत नव्हती, यातून अधिकाधिक वाचनही त्यांनी केले त्यामुळे नवनवीन कल्पना व संकल्प यांना एक दिशा भेटत गेली. यात प्रमुख भर पडली ती म्हणजे 2008 साली, के. बी. एक्सपोर्टस इंटरनॅशनलची पायाभरणी फलटण तालुक्यात झाली.
जेव्हा एखाद्या व्यवसायाची सुरुवात होते, तेव्हा तो व्यवसाय सहजासहजी यश हाती देत नाही. त्यासाठी सामना करावा लागतो तो असंख्य जीवघेण्या अडथळ्यांचा, अथक प्रयत्नांचा. यामध्ये यशस्वी तेच लोक होतात जे अडथळ्यांची पर्वा न करता लढत असतात. लढणारा योद्धा शस्त्र खाली ठेवेल तो योद्धा कसला! सरांनी आपल्या अनुभवाच्या कौशल्यावर एक पण केला तो पण म्हणजे शेतकऱ्यांचा विकास हाच ध्यास! या ध्यासातून स्वतः सर हातामध्ये पेन आणि डायरी घेत अगदी बारीक गोष्टींची नोंद ठेवून मार्गस्थ होते. ठरवलेले ध्येय जर प्रामाणिक असतील तर या कार्यात आपोआपच प्रामाणिक सहकाऱ्यांची मांदियाळी मजबूत होत असते. या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सरांनी मायबाप शेतकऱ्यांच्या विकासासाठी रेसिड्यू फ्री शेती उत्पादन ही संकल्पना पुढे आणून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवण्याऱ्या कार्याचा श्री गणेशा केला. रेसिड्यू फ्री कृषीमालाची निर्यात युरोपियन मार्केटमध्ये अव्वल क्रमांकाने चालू झाली. याच विश्वासाच्या बळावर आज भेंडीसोबतच डाळिंब, बेबीकॉर्न, आंबे, कडीपत्ता, दुधी अशा ताज्या पालेभाज्या व फळे यांची मोठ्या प्रमाणात होत असणारी मागणी व तितक्याच विश्वासाने ते अवघ्या 24 तासात भारतातून एक्स्पोर्ट केले जात आहे. यासोबतच अगदी विदेशी फळ म्हणून ओळखले जाणारे ड्रॅगन फ्रुट देखील निर्यात करत आहे व असे करणारी भारतातील पहिली निर्यात कंपनी बनण्याचा मान मिळाला आहे ज्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने देखील दखल घेऊन कौतुक केले आहे.
युरोपात निर्यात करत असताना घातक रासायनिक कीटकनाशकांचे अंश यामुळे अडथळे निर्माण होतील याची चाहूल लागताच शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी श्री.सचिन यादव सर यांनी विविध तज्ञ शास्त्रज्ञांना सोबत घेऊन विविध वनस्पतींच्या अल्कोलॉइड्स पासून वनस्पतीजन्य जैव कीटकनाशके बनवणाऱ्या के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा.ली. कंपनीची स्थापना केली. यामुळे आज शेतकऱ्यांना निरोगी व निर्यातक्षम कृषीमालाचे उत्पादन मिळवण्यासाठी बाजारात एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या औषधांच्या वापरामुळे शेतकऱ्यांसोबतच कृषी मालाचा वापर म्हणजेच फळे भाजीपाल्याचे सेवन करणाऱ्या सामान्य नागरिकांना देखील रसायनमुक्त अन्न मिळविणे सोपे झाले आहे. कंपनीची वृद्धी करत असतांना शेतकऱ्यांच्या सेवेत कधीच खंड पडू न देता वेळोवेळी कंपनीच्या कायदेशीर व संरक्षणामक दृष्ट्या पाऊले टाकत कंपनी कार्यात कधीच कोणता अडथळा निर्माण न होऊ देता कंपनीच्या वेगात भर टाकत आहेत यातून सरांचा दूरदृष्टीकोन स्पष्ट अधोरेखित होतो. या कंपनीच्या स्थापनेमुळे फलटण, बारामती, पुरंदर, इंदापूर, माण - खटाव, माळशिरस तालुक्यातील तसेच इतर राज्यातील हजारो कुशल अकुशल कामगारांच्या हाती काम देण्याच भाग्य यांनी मिळवले. कंपनीने कमी कालावधीत उत्तुंग अशी भरारी घेत भारतातील प्रमुख राज्यांमध्ये कंपनीची सुरुवात करत शेतकऱ्यांचे एक विश्वासाचे केंद्रच या राज्यांमध्ये पोहोचल्याचा आनंद शेतकऱ्यांना मनोमन के. बी. बायोच्या माध्यमातून वाटत आहे. अधिक जलद गतीने सेवा प्रदान करता यावी यासाठी इंदोर (मध्यप्रदेश) येथे ऑफिस स्थापनाही करण्यात आली आहे व देशाची राजधानी दिल्ली येथे लवकरच कंपनीच्या नवीन ऑफिसची स्थापना करण्यात येणार आहे. निरोगी व सदृढ भारत घडवण्याच्या दृष्टीकोनातून अनेक शेतीसंबंधी व्यवसायिकांनाही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अधिक जलद गतीने उपलब्ध राहता यावे, त्यांच्या उद्योगास चालना मिळावी यासाठी NEWAGE इनोवेशन्स प्रा. लिमिटेड कंपनीची स्थापनाही श्री. सचिन यादव यांनी केली. त्यामुळे छोट्या उद्योजकांनाही त्यांच्या व्यवसायाचा ब्रँड बनवणे सहज शक्य झाले आहे. भविष्यावर नजर ठेवत वर्तमान व भविष्यकाळात रसायनमुक्त उत्पादने प्रत्येक भारतीयाच्या ताटात पोहोचावीत यासाठी ग्रीन इरा व 100X आयुर्वेदा कंपनीची स्थापना करत सरांची विचारांची सखोलता अजूनच मनामध्ये स्थान वाढवत जाते.
उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असताना सरांचे जमिनीवरचे पाय, माय मातीशी असलेलं नातं हे कधीच कमी होताना दिसलं नाही. उलट वेळोवेळी ते अधिकच भक्कम होत असताना दिसत. कंपनी एक कुटुंब ही संकल्पना आत्मीयतेपासून आपल्या कंपनीमध्ये राबवून कंपनीतील प्रत्येक घटकाच्या सुख दुःखात हक्काने श्री.सचिन यादव सर सामील होत असतात. याचे खूप दाखलेही प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे आहेत. कोरोना सारख्या भयान महामारीमध्ये स्वतःहा ग्राउंडला उतरून समाजातील गोरगरीब व्यक्तींच्या सेवेसाठी स्व हजर होते. अनेकांना सरांच्या मदतीमुळे मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत एक देवदुताची भूमिकाही निभावताना आपणास दिसतात. एवढेच नव्हे तर समाजातील गोरगरीब होतकरू तरुणांना, अगदी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना आर्थिक आणि मार्गदर्शक पाठबळ कोणताही गाजावाजा न करता सचिन सर देतअसतात. एव्हाना खूप खेळाडू आज क्रीडा क्षेत्रात देशाचे नेतृत्वही करत आहेत.
स्वतः एक नेतृत्वाचे ज्वलंत उदाहरण बनत वेळोवेळी कोणताच गर्व न करता जाज्वल्य आणि कुशल नेतृत्वशैली बहरविण्यासाठी सर प्रयत्नशील दिसतात, ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी देशाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अवघ्या शंभर व्यक्ती मला द्या असे जाहीर आवाहन देशवाशियांना केल्यानंतर असे शंभर व्यक्ती त्यांना कधीच हाती आले नाहीत. मात्र सरांनी एक पाऊल पुढे टाकून अनेक सहकाऱ्यांचे गुणशैली ओळखून त्यांना त्या क्षेत्रामध्ये वाव देण्यामध्ये सरांचा हातखंडाच. सरांनी स्वतःच आपल्या सहकाऱ्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण करत जगाच्या पाठीवर अभिमानाने प्रवास करण्याची ताकत निर्माण केली आहे. यातूनच नेहमीच सर हाती घेतलेलं काम सहजरीत्या यशाच्या बाजूने झुकवू शकतात तेही दैदीप्यमान यशाने!
प्रत्येक गोष्टीत सूक्ष्म निरिक्षण, प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी आपलेपणाची श्रीमंती बहरवण्यात सर यशस्वी आहेत. सोबतच कृषी क्षेत्रात वेगाने प्रगती साधायची असेल तर सहकार क्षेत्रावर प्रभुत्व मिळवण्याची गोष्टही त्यांच्याकडून चुकली नाही. गॅलेक्सी बँकेची स्थापनाच नव्हे तर अवघ्या कमी कालावधीत ठेवीदारांच्या विश्वासास खरे ठरत सहकार क्षेत्रातील आदर्शही सरांनी इतरांसमोर ठेवला आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे ज्या गोष्टीला सर हात घालतात तिथे यशाला पाझर फोडण्याची ताकत आपसूकच येते. अशा अनेक यशाने के. बी. नावाचा समुद्र ज्याची अथांगता कोणालाच मोजता येणार नाही असा बनवला आहे याची व्याप्ती अशीच आपल्या दीर्घायुष्याने वाढत जावो!
No comments