'जोशी हॉस्पिटल' ने रचला इतिहास ; विठू रोबोच्या साथीने १०० गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ - जोशी हॉस्पिटल प्रा. लि. हे फलटण येथे अस्थिरोग उपचारासाठी गेली २३ वर्षे रुग्ण सेवेत रुजू आहे. डॉ प्रसाद जोशी हे येथील प्रमुख अस्थिरोग शल्यचिकित्सक आहेत. आज पर्यंत गेल्या २३ वर्षात त्यांनी हाडांच्या गुंतागुंतीच्या २०००० हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत, ४०००हून अधिक गुडघ्याच्या आणि खुब्याच्या सांध्यांचे प्रत्यारोपण केले आहे.
२०१२ पासून जर्मनी येथून आणलेले नॅविगेशन तंत्रज्ञान वापरून सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यास डॉ. प्रसाद जोशी यांनी सुरुवात केली . २५ मे २०२३ रोजी भारतातील तालुकास्तरीय पाहिले रोबोटिक सेंटर, "फलटण रोबोटिक्स सेंटर " या नावाने जोशी हॉस्पिटल प्रा लि येथे सुरू करण्यात आले असून, या रोबो चे नामकरण "विठू " असे करण्यात आले आहे असे डॉ प्रसाद जोशी यांनी सांगितले. गेल्या ५ महिन्यात " विठू रोबो " च्या साहाय्याने जोशी हॉस्पिटल प्रा लि येथे १०० गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या नुकत्याच पार पाडण्यात आल्या. रोबोटिक्स चे तंत्रज्ञान भारतातील काही शहरातच उपलब्ध आहे . तालुका स्तरीय हे भारतातील पहिलेच रोबोटिक सेंटर असून या तंत्रज्ञानाचा फायदा गावाकडील गुडघेदुःखी ने जर्जर झालेल्या पेशंट्स ना रास्त दरात मिळतो आहे .
सध्या जोशी हॉस्पिटल प्रा. ली. येथे संधेरोपणासाठी सातारा, पुणे , मुंबई , नागपूर , लातूर ,नांदेड, कोल्हापूर , सांगली , पंढरपूर, सोलापूर , रत्नागिरी , लांजा , गोवा, बेळगांव , रामदुर्ग आणि बंगळूर हून पेशंट्स येत आहेत. नुकतेच काशी गया , वाराणसी आणि अमेरिकेतून काही पेशंटस् नी आपले सांधे बदलून घेतले आहेत.
भारतात तालुका स्तरीय ठिकाणी एकाच हॉस्पिटल मध्ये एकाच सर्जन-नी सर्वात जास्त सांधेरोपण केल्या मुळे २०१७ साली डॉ प्रसाद जोशी यांना इंडियन आचिव्हर्स अवॉर्ड ने आणि २०१८ साली भारत गौरव अवार्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच एक्सलन्स इन ऑर्थोपेडिक्स किताब २०१९ मध्ये त्यांना मिळाला आहे.
इथून पुढच्या काळात रोबोटिक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करून संधेरोपणा मध्ये क्रांती होईल आणि त्याचा फायदा रास्त दरात गावाकडील पेशंट्स ना करून देण्याचा विश्वास डॉ प्रसाद जोशी यांनी आवर्जून नमूद केला.
रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे फायदे असे आहेत
- सांध्यात येणारी अधिक अचूकता .
- ऑपरेशन नंतर होणारी फास्ट रिकव्हरी .
- ऑपरेशनच्या वेळेस होणारा खूप कमी रक्तस्त्राव.
- ऑपरेशन नंतर होणारे वेदनांचे खूप कमी प्रमाण.
- पेशंट दुसऱ्या दिवशी आपल्या स्वतःच्या पायांवर उभे राहून वॉकर च्या सहायानी चालायला लागतो. या सर्वांचा एकत्र फायदा असा की पेशंट दुखः विरहित होऊन लवकर घरी जातो.
No comments