Breaking News

हिवरेतील खून प्रकरणाचा छडा अवघ्या दोन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि वाठार पोलिसांना यश

Local crime branch and Vathar police succeeded in solving the Hivra murder case in just two days

सातारा 27  :स्वतःला दुधर आजार झाल्याच्या सशयाच्या भातानतर आपल्या पश्चात मुलालाहा दुधर आजार होईल, मग त्याचा सांभाळ कोण करणार, त्याचे हाल होतील, या विवंचनेतून पोटच्या पोराचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळल्याची कबुली बापाने पोलिसांजवळ दिली. हिवरेतील खून प्रकरणाचा छडा अवघ्या दोन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि वाठार पोलिसांना यश आले.
विजय आनंदराव खताळ (वय ३६, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे पोलिसांनी अटक केलल्या संशयित वडिलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, हिवरे येथील सहावीत शिकणाऱ्या विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ (वय १२) या मुलाचा शनिवार, दि. २३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उसाच्या फडात गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन हा खून तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार कोरेगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी स्वतंत्र दोन पथके नेमली. या दोन्ही पथकांनी सर्व शक्यतांचा अभ्यास करून 'तपासाला सुरवात केली. मुलाचे वडील विजय खताळ आणि गावातील काही लोकांनी सांगितलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय वडील विजय खताळ यांच्यावरच बळावला. पोलिसांच्या पथकाने विजय खताळ याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलाचा खून आपणच केल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. वाठार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments