Breaking News

मुधोजी कॉलेज च्या 'उदय' वार्षिक नियतकालिकास शिवाजी विद्यापीठाचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद

Mudhoji College's 'Udaya' annual magazine won Shivaji University's first prize

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मुधोजी महाविद्यालयाच्या 'उदय' वार्षिक नियतकालिक २०२१-२२ अंकास शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालय नियतकालिक स्पर्धा  २०२१-२२ स्पर्धेत बिगर व्यावसायिक गटातून  प्रथम क्रमांकाचे सर्वसाधारण  विजेतेपद जनरल चॅम्पियनशीप ट्रॉफी शिवाजी विद्यापीठाचे  कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के  यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीचे वितरण करण्यात आले.

    प्र. कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद पाटील यांनी आपल्या मनोगतात "विद्यार्थ्यांच्या साहित्यिक , वैचारिक, प्रादेशिक भाषा तसेच कलात्मक सृजनशीलतेला तसेच स्थानिक भागापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील समस्यांविषयक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणारे तसेच महाविद्यालयीन उपक्रमांचे प्रतिबंब म्हणजेच महाविद्यालयाचा नियतकालिक अंक त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाने या  स्पर्धेत सहभागी  झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.

    अध्यक्षीय भाषणात  कुलगुरू मा. प्रा. डॉ. दिगंबर  शिर्के यांनी असे मत व्यक्त  केले की, प्रत्येक महाविद्याल्याने या सपर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या साहित्यिक व कलात्मक प्रगल्भतेला जागृत करण्याचे  कार्य केले पहिजे असे मत व्यक्त केले. कुलसचिव प्रा.डॉ. व्ही.  एन. शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

    महाविद्यालयाच्या या  ऐतिहासिक यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  श्रीमंत  रामराजे नाईक निंबाळकर , नियामक मंडळाचे चेअरमन,  श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य पार्श्वनाथ रंजवैद्य तसेच प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर यांनी  प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर, 'उदय'नियतकालिक अंकाचे प्रमुख संपादक प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर , सर्व समिती सदस्यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments