राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या मुलींच्या संघास सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटणच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने कोल्हापूर विभागाचे नेतृत्व केले व या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
इस्लामपूर येथील राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या यजमान कोल्हापूर विभागाला (मुधोजी हायकूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण ) विजेतेपद मिळाले, तर पुणे विभागाला (अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल , बारामती )उपविजेतेपद मिळाले.
या स्पर्धेतील पहिला सामना नाशिक संघाविरुद्ध झाला, हा सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. हा सामना ३-१ गोल फरकाने जिंकून या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यांमध्ये कु. श्रद्धा यादव हिने सलग तीन गोल नोंदवून स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली. उपांत्य सामना मुंबई विभागा विरुद्ध झाला. हा सामना देखील ५ -० गोल फरकाने जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या सामन्यांमध्ये गायत्री खरात, वेदिका वाघमोरे, अनघा केंजळे व सिद्धी केंजळे यांनी गोल नोंदवले.
या स्पर्धेतील अंतिम सामना पुणे विभागा विरुद्ध झाला. हा सामना देखील ३ -० गोल फरकाने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यांमध्ये अनघा केंजळेने एक गोल नोंदवला व वेदिका वाघमोरे हिने दोन गोल नोंदवले. या संपूर्ण सामन्यांमध्ये फॉरवर्ड लाईन मध्ये वेदिका वाघमोरे, सिद्धी केंजळे , गायत्री खरात, अनघा केंजळे व श्रद्धा यादव , केतकी बोले, यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले.
हाफ लाईन मध्ये समृद्धी बनकर, समृद्धी दगडे, गौरी हिरणवाळे, तनुष्का कदम, इशिका कर्णे यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. बचाव फळी मध्ये मृण्मयी घोरपडे, मानसी पवार, सिद्धीका शेख, यांनी देखील चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत गोलकीपर म्हणून आरोही पाटील व क्षितिजा बोडरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विरुद्ध संघाचे गोल चे संरक्षण करून अडवले. राज्यस्तरीय स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू म्हणून वेदिका वाघमारे ची निवड करण्यात आली . विजय संघास ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, प्रशिक्षक सचिन धुमाळ, खुरंगे बी.बी व कु. धनश्री क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
या विजय संघास व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री दीपकराव चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, मुधोजी हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य , क्रीडा समितीचे सर्व सदस्य तसेच मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री बाबासाहेब गंगवणे , ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री देशमुख डी.एम . पर्यवेक्षक श्री शिंदे व्ही.जी., सौ. सुनिता माळवदे , श्री जाधव जी.ए. , प्रशालेतील सर्व शिक्षक व क्रीडा शिक्षक तसेच दि हॉकी सातारा संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. यामध्ये सिद्धी केंजळे, मानसी पवार, वेदिका वाघमोरे व गायत्री खरात यांची निवड करण्यात आली.
No comments