Breaking News

निंभोरे सरपंच सौ.कांचन निंबाळकर यांचा राजे गटात प्रवेश

Nimbhore Sarpanch Mrs. Kanchan Nimbalkar's entry into Raje group

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ डिसेंबर - निंभोरे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.कांचन रमेश निंबाळकर यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राजे गटात प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे,  मा उपसरपंच मुकुंदराव रणवरे, दादासाहेब चोरमले, किशोरसिंह नाईक निंबाळकर,  नितीन मदने व इतर मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना सौ. कांचन निंबाळकर म्हणाल्या की, मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होते व यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच कामकाज करणार आहे. मागील काळामध्ये काही गैरसमज झाले होते. ते आता सर्व दूर झाले आहेत. आगामी काळामध्ये निंभोरे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे नेते विधानपरिषदेचे माजी सभापती  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करणार असल्याचे मत निंभोरे गावच्या सरपंच सौ. कांचन निंबाळकर यांनी व्यक्त केले.

No comments