Breaking News

खा. रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळेच निरादेवघर प्रकल्प पूर्णत्वास गेला - गजेन्द्रसिंह शेखावत

Niradevghar project was completed only because of Ranjitsih Naik Nimbalkar's follow-up - Gajendra Singh Shekhawat

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणारा निरादेवघर प्रकल्प ज्यांच्या मध्ये भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला हे  दुष्काळी तालुके येतात. गेली अनेक वर्ष रखडलेल्या अवस्थेमध्ये हा प्रकल्प होता, परंतु खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्याच्या पाठपुरामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्य शासनाने यापूर्वीच मंजुरी देऊन, निधीची तरतूद केली होती व आज केंद्र शासनाने  यावर अंतिम गुंतवणूक स्पष्टता यास मंजुरी दिली व निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी  दिली.

    यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक वर्ष हा प्रकल्प रखडला होता, परंतु मी पंढरपूरमध्ये येऊन शब्द दिला होता, या प्रकल्पास मंजुरी देईल . आज तो शब्द मी पाळला आहे, यामुळे या भागातील शेतकरी शेतमजूर यांचा पिण्याचा पाण्याचा व शेतीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे.  यापुर्वीच्या सरकारने हा प्रकल्प रखडवला  होता, परंतु देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही राज्यांमध्ये सेन्ट्रल वॉटर कमिशन  पाठवून हा प्रकल्प हायड्रोलिजकल दृष्ट्या योग्य आहे की नाही, याचा सर्व्हे करून घेतला. व भारत सरकारच्या टीमने यास टेक्निकल मंजुरी दिली. 

    आज मला सांगताना आनंद होतो की, भारत सरकारने यास गुणवत्ता स्पष्टता मंजुरी देऊन, निधी उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध होणार आहे व कायम स्वरुपी दुष्काळी परिस्थिती हाटणार आहे, यामुळे हा परिसर आर्थिक दृष्ट्या सुजलाम सुफलाम होईल व या भागातील युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल. नोकरी निमित्ताने युवकांना मुंबई पुणे ला जावे लागणार नाही. असा विश्वास जलसंपदा मंत्री गजेन्द्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला.

No comments