Breaking News

खा. रणजितसिंह यांना गेल्या वेळीपेक्षा जास्त मतांनी निवडून आणायचे - मकरंद देशपांडे

Ranjit Singh should be elected with more votes than last time - Makarand Deshpande

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम केले आहे, गेल्या ५०  वर्षात जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न, राजकीय दृष्टया   आडकवला होता, तो सोडवण्यासाठी गेली चार वर्षे संघर्ष केला व पाणी प्रश्न सोडवला. रेल्वे, रस्ते, एम आय डी सी , दवाखाना, कोर्ट , असे अनेक  विकास कामे मार्ग लावली. त्यामुळे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांना गेल्या वेळीपेक्षा जास्त मतांनी विजयी करावे असे आवाहन भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले आहे.

    फलटण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कोअर कमिटीची बैठक पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यालयात संपन्न झाली. यावेळी मकरंद देशपांडे बोलत होते, याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील , फलटण ता. प्रभारी विश्वासराव भोसले , जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे. जिल्हा चिटणीस बाळासाहेब कदम , पुर्व  मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते , महिला अध्यक्ष ऊषा राऊत उपस्थित होते.

    पुढे  बोलताना मकरंद देशपांडे म्हणाले की, फलटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी  ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच शासकीय योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावेत.

    यावेळी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेसाठी वेळ देऊन, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच लवकरच पश्चिम महाराष्ट्राची पक्ष संघटनेसाठी एकाच ठिकाणी वॉर रूम तयार करण्याचा माझा मानस आहे, विकास कामा बरोबरच पक्ष संघटनेसाठी वेळ देणार आहे. प्रत्येक बुथ रचनेचा मी स्वतः आढावा घेणार आहे. व मी स्वतः तीन बुथची जबाबदारी घेऊन, त्या बुथमधील समिती तयार झाली आहे का?  विजयासाठी एक्कावन टक्के ची लढाई करावी लागेल. तरी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सुचना दिल्या.

    यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी पक्षाची रचना लवकर कराव्यात व सुपर वारीयर्स ला बुथ वाटुन देऊन, त्यांच्या कडून बुथ समिती सक्षम करावेत, लवकरच प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा येणार असल्याचे सांगितले.

    यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन अहिवळे, महादेव अलगुडे, विस्तारक शरद झेंडे, राजेंद्र काकडे , संतोष गावडे, संतोष सावंत, सुनील जाधव, नितिन जगताप , सुरज तांदळे , विशाल नलवडे , जालिंदर सस्ते , युवराज सस्ते बबलु मोमीन , रियाज इनामदार महिला पदाधिकारी उपस्थित होते.

No comments