Breaking News

श्रद्धा शिंदे हिची शिवाजी विद्यापीठ व्हॉलीबॉल संघामध्ये निवड

Shraddha Shinde selected in Shivaji University Volleyball team

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - मुधोजी महाविद्यालयाची व्हॉलीबॉल खेळाडू कु. श्रद्धा शिंदे हिची शिवाजी विद्यापीठ व्हॉलीबॉल संघामध्ये निवड झाली आहे. पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा ह्या  महाराजा छत्रस्थळ बुंदेलखंड विद्यापीठ, छत्रपूर, उत्तरप्रदेश  या ठिकाणी होत आहेत.

    या निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी श्रद्धा शिंदे हिचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments