जावायाने केले सासऱ्याचे अपहरण ; गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० डिसेंबर - बायको व दोन मुलांना माझ्याकडे आणून सोडा या कारणासाठी वयोवृद्ध सासऱ्याचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी जावयाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाळकृष्ण भिमराव ढेंबरे रा. शिंदेवाडी, ता. फलटण, जि. सातारा असे संशयिताचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, दिनांक ८/१२/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान, फिर्यादी सौ. सुनंदा धनसिंग भोसले वय ६४ वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा.चौधरवाडी फलटण या त्यांच्या जावेच्या मुलाच्या लग्नासाठी अकलुज ता. माळशिरस या ठिकाणी गेले असताना, त्यांचे पती धनसिंग महादेवराव भोसले वय ७२ वर्षे हे एकटेच घरी मौजे चौधरवाडी, ता. फलटण येथे असताना जावई - बाळकृष्ण भिमराव ढेंबरे रा. शिंदेवाडी, ता. फलटण, जि. सातारा यांनी माझी बायको शुभांगी व दोन मुले यांना माझ्याकडे शिंदेवाडी या ठिकाणी आणुन सोडा या कारणावरून पळवुन नेवुन डांबुन ठेवले आहे, व तुमचे बरे वाईट करीन अशी धमकी देत असल्याचे फिर्याद सासू सौ. सुनंदा धनसिंग भोसले यांनी जावई बाळकृष्ण भिमराव ढेंबरे रा. शिंदेवाडी, ता. फलटण, जि. सातारा यांच्या विरुध्द दिली आहे. त्याच्या अनुषंगाने फलटण शहर पोलीस स्टेशन येथे जावई ढेंबरे यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments