भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दि. २६ डिसेंबर रोजी फलटण दौरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी "लोकसभा प्रवास” या मोहिमे अंतर्गत माढा लोकसभा मतदार संघातील फलटण व अकलूज येथे येणार आहेत. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता महावीर स्तंभ फलटण येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागरिक, व्यापारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की; भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे हे फलटण दौऱ्यावर येत आहेत. बावनकुळे यांचा संपूर्ण राज्यातील लोकसभा प्रवास अंतर्गत माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा नियोजित आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार असून त्यासोबतच फलटण येथील नागरिक, व्यापारी व दुकानदार यांच्याशी सुद्धा हितगुज करणार आहेत.
No comments