फलटणच्या जुई सोनवणे ची गगनभरारी ...३० लाखाचे पॅकेज
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण येथील कु. जुई राहुल सोनवणे हिची वयाच्या २० व्या वर्षीच मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये ३० लाख रुपयांच्या पॅकेज वरती कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड करण्यात आली आहे. जुई सोनवणे हिने अवघ्या वयाच्या २० व्या वर्षी चांगल्या पगाराची नोकरी मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.
जुई ही मलठण, फलटण येथील श्री.राहुल सोनवणे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पारशिवणी नागपूर ग्रामीण यांची कन्या आहे. तर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद सोनवणे यांची पुतणी आहे. तसेच जुई हिने आजोबा जयप्रकाश सोनवणे मुख्याध्यापक व आज्जी कांता सोनवणे शिक्षिका यांचे स्वप्न साकार केले आहे.
जुई सोनवणे आय आय टी, मुंबई (IIT, Mumbai) येथे डिझाईन या शाखेत असताना या वर्षी आलेल्या जागतिक नामांकित कंपनीपैकी "मायक्रोसॉफ्ट"या कंपनीत कॅम्पास मुलाखतीव्दारे तिची कायमस्वरूपी नोकरी साठी निवड झाली...या नामांकित कंपनीद्वारे वार्षिक ३० लाखांचे पॅकेज मिळणार आहे तसेच कंपनीच्या सोयीसुविधा मिळणार आहेत
जुई हीचे १० वीचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे झाले तिला ९६.५०% व स्टुडंट ऑफ द इअर असा असे ॲवॉर्ड मिळाला. १२ वी चे शिक्षण शिवाजी सायन्स कॉलेज नागपूर येथे झाले तिला ८८% मिळाले.त्यानंतर तिने जेईई मध्ये ९९.०९ % मिळावले. त्यानंतर अहमदाबाद येथे एन आय एफ टी परिक्षेत देशात ६ वी रँक मिळाली. तसेच आय आय टी मुंबई व्दारे यु सी ई ई डी या परिक्षेत घवघवीत यश मिळवुन आय आय टी मुंबई (IIT, Mumbai) येथे प्रवेश मिळविला तेथे ती चौथ्या वर्षाला शिकत आहे.
या यशाबद्दल जुई सोनवणे हिचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर तसेच वीरशैव ककय्या समाज,मलटण यांनी अभिनंदन केले.
No comments