Breaking News

मुधोजी महाविद्यालयाचे बॉक्सिंग स्पर्धेमध्येे यश

Success of Mudhoji College in Boxing Competition

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - शिवाजी विद्यापीठ अंतर्गत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय,सातारा येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या कु.गीतांजली बंडगर हिने ५२-५५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला तसेच कु.प्रियांका मदने ६६-७१ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला.

    फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य,संस्थेचे प्रशासनअधिकारी प्राचार्य अरविंद निकम ,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम व जिमखाना प्रमुख डॉ. पाटील एस.डी यांनी सर्व विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments