Breaking News

राजमाता सईबाई स्मृतीस्थळास २९.७३ कोटी मंजुर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार - खा. रणजितसिह नाईक निंबाळकर

Thanks to Deputy Chief Minister Devendra Fadnavis for sanctioning 29.73 crores for Rajmata Saibai Memorial - MP Ranjitsih Naik Nimbalkar

    फलटण (दैनिक गंधवार्ता) दि.१ -  राजमाता सईबाई स्मृतीस्थळास रूपये २९.७३ कोटीच्या विकास आराखड्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आभार मानले आहेत. 

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री यांची राजगड येथे दुर्लक्षित असणारी समाधीची अवस्था अत्यंत खराब झाली. यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी   ऐतिहासिक समाधीचा जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी निधीची मागणी केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी तातडीने विशेष बाब म्हणून मान्यता दिली. व मुख्य सचिवांचे अध्यक्षतेखाली बैठक होऊन १७/११/२०२३ रोजी यास मान्यता देत २९.७३  कोटी रुपये मंजूर करण्यात आले व याचे काम पाहण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. राजमाता सईबाई  स्मृतीस्थळास मंजूर झालेल्या निधीमुळे सातारा व फलटण तालुक्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

No comments