लग्न कार्यालयातून १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिन्यांची चोरी
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - मातोश्री मंगल कार्यालय, बरड ता. फलटण येथून, १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दि. १७/१२ २२०३ रोजी दुपारी १ ते १.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे बरड ता. फलटण गावचे हद्दीत मातोश्री मंगल कार्यालय येथून, कैलास संभाजी ठणके रा. मुंजवडी ता. फलटण यांच्या मालकीचे १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. यामध्ये अ)१ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा सोन्याच्या पावणेतीन तोळ्याचा एक राणीहारब) ३७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पाऊण तोळ्याचे कानातील टॉप्स, क) २६ हजार रुपये किंमतीचे चांदीचा ३१.१०० ग्रॅम वजनाची गणपती मूर्ती, ड) २ हजार पाचशे ४४ रुपये किंमतीचे चांदीचे ३०.९४० ग्रॅम वजनाचे एक ब्रेसलेट
इ) २ हजार आठशे ५२ रुपये किंमतीचे चांदीचे ३४.६९० ग्रॅम वजनाचे एक ब्रेसलेट ई) २ हजार दोनशे बारा रुपये किंमतीचे चांदीचे २३.७०० ग्रॅम वजनाचे एक पंचपाळ यांचा समावेश आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चांगण हे करीत आहेत.
No comments