सुरवडी येथे ट्रान्सफॉर्मर चोरी ; २० हजार रुपयांची तांब्याची तार व १०हजारच्या ऑइलचे नुकसान
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - फलटण शहर ता. २५ : सुरवडी ता. फलटण गावच्या हद्दीतील रेल्वे लाईन शेजारील विद्युत ट्रान्सफॉर्मर पाडून त्यातील १० हजार रुपये कींमतीचे ऑईलचे नुकसान करून, आतील २० हजार रुपये किंमतीची तांब्याची तार चोरुन नेल्याने आज्ञात चोरट्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ५ ते दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान मौजे सुरवडी तालुका फलटण येथील रेल्वे लाईन जवळ असणारा रेल्वे स्टॅन्ड नावाचा इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर खाली पडून त्यातील १००००/-रुपये किंमतीचे ४० लिटर ऑइल जमिनीवर खाली सांडून नुकसान करून त्यातील २०० किलो वजनाची २००००/-रुपये किंमतीची कॉपर वायर कोणीतरी अज्ञात इसमाने काढून चोरून नेली फिर्याद वरिष्ठ तंत्रज्ञ सचिन पांडुरंग पवार यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार पिसे हे करीत आहेत.
No comments