Breaking News

एड्स नियंत्रण संस्था व कृपासिंधू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विविध स्पर्धा संपन्न

 

Various competitions were held on behalf of AIDS Control Organization and Kripasindhu Charitable Trust

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था ए आर टी सेंटर उपजिल्हा रुग्णालय फलटण व कृपासिंधू चॅरिटेबल ट्रस्ट मलठण यांच्या संयुक्त विद्यमाने  फलटण येथे रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

    रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ फलटण नगर परिषदेचे गट नेते व कृपासिंधू चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री अशोकराव जाधव, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, दत्तात्रय थोरात डॉ. धवन, डॉ. धुमाळ, डॉ. जगताप, डॉ. लादे व उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाचे सर्व अधिकारी तसेच रुग्णालयातील रुग्ण व स्पर्धक यांच्या उपस्थितीत पार पडला. सूत्र संचालन सौ. ज्योती शिंदे यांनी केले.

No comments