Breaking News

शिक्षण क्षेत्रात ज्ञानाचा प्रकाश पाडणारे तेजोमय व्यक्तिमत्त्व

Vishal Pandurang Pawar's birthday is being celebrated today

    आजच्या विज्ञानाच्या युगात गरुडाचे पंख लावून कोणालाही उडता येतं, पण भरारी घेण्याचं वेड हे फक्त रक्तातच असावं लागतं.  ज्यांच्या रक्तातच भरारी आहे तसेच जिद्द, चिकाटी व बुद्धीच्या जोरावर आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवणारे, आपल्या मनगटाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणारे, नियतीने रचलेल्या  कित्येक  पेचांना कलाटणी देवून लखलखत्या, तळपत्या भास्कराप्रमाणेच स्वतःच्या प्रगल्भतेची प्रखरता सर्वत्र तेजोमय करणारे, तसेच फलटण तालुक्यात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेतात आपल्या शांत व मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखले जाणारे नेतृत्व म्हणजेच, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय श्री. विशाल पांडूरंग पवार सर यांचा आज दि. 8 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा....

    समाजाच्या जडणघडणीमध्ये स्वतःच्या कर्तुत्वाने भर घालणारे, मूल्यांवर विश्वास ठेवणारे, वैचारिक उंची असलेले, सेवा हे परमं धर्म मानणारे, राजकीय क्षेत्रात सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले, येणाऱ्या काळाची गरज ओळखून आपल्या दूरदृष्टीने देशासाठी एक चांगली पिढी घडविण्यासाठी 2008 मध्ये कोळकी (फलटण) येथे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हे शैक्षणिक संकुल सुरू करणारे व्यक्तिमत्व. या संकुलाच्या माध्यमातूनच त्याच्या कर्तृत्वाची गाथा आरंभ झाली. पण एवढ्यावरच ते थांबणारे नव्हते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही  उच्च प्रतीचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण  घेता यावे म्हणून  जून, 2015 साली गुणवरे येथे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हे शैक्षणिक संकूल सुरू केले.

    घरची परिस्थिती बेताची असुनही आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून वडिलांनी केलेला संघर्ष, त्यांची धडपड व शिक्षणाचा अट्टाहास हे सर्व आदरणीय विशाल सरांनी जवळून अनुभवले होते. आपल्या ज्ञानरूपी कृतीशील विचारधारेच्या प्रकाशाने चिरंतर प्रेरित होऊन स्वतःच्या कर्तृत्वावर यशाची शिखरे सर करून शिक्षणक्षेत्रात आपल्या उत्कृष्ठ व्यवस्थापनेचा ठसा उमटवला. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे ते समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तिंशी जोडले गेले. माणुसकी हाच आपला धर्म असे मानणारे, वेळ, काळ, काहीही न बघता इतरांच्या  मदतीला धावून जाणारे , कोरोना सारख्या भयानक काळातही अनेकांचा पोशिंदा ठरलेलेले असे आपले मा. श्री विशाल पवार सर.

    कोणताही शैक्षणिक व राजकीय वारसा नसतानाही दोन्ही शैक्षणिक संकुले वटवृक्षाप्रमाणेच बहरत आहेत. या शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने विविध शालेय व सहशालेय, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. त्यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी वेळोवेळी सुसंवाद साधुन योग्य तो समन्वय साधला जातो. अल्पावधितच सरस्वती शिक्षण संस्थेने यशाची उत्तुंग भरारी घेऊन सर्वत्र नावलौकिक मिळवला आहे.

    आज दोन्हीही संकुले  कला, क्रिडा, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.

    मा विशाल पवार सर तुमच्या आयुष्यातील संकल्प असावेत नवे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावेत आपले याच आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

    आपणास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्यातर्फे आरोग्यदायी आनंददायी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!

No comments