मॅग आणि माऊली फाउंडेशन संचलित जनसेवा वाचनालयातर्फे फलटण येथे व्याख्यानमाला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मॅग आणि माऊली फाउंडेशन संचलित जनसेवा वाचनालयातर्फे शनिवार दिनांक २३/१२/२०२३ रोजी महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे सकाळी १० वाजता व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध प्रभावी वक्ते श्री.तात्यासाहेब मोरे यांचे "उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी" या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमा बरोबर नुकत्याच झालेल्या वक्तृव आणि निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. वक्तृत्व व निबंध स्पर्धा १ ते ३ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांना सर्व इयत्ता गटातील ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या व्याख्यानमाला व बक्षीस वितरण कार्यक्रमास सर्वानी आवर्जून उपस्थित राहावे आणि व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा असे मॅग आणि माऊली फाउंडेशन तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
No comments