आनंदवन प्राथमिक शाळेमध्ये आठवडी बाजार
![]() |
भाजी मंडईची पाहणी करताना अॅड.सौ मधुबाला भोसले, सौ. दमयंती कुंभार, सौ. राजस भोईटे व इतर |
कोळकी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे व प्रत्यक्ष आठवडी बाजारात कशा पद्धतीने व्यवहार चालतात याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या हेतूने सहशालेय उपक्रमांतर्गत फलटण येथील आनंदवन प्राथमिक शाळेमध्ये मुले व मुली यांच्यावतीने शाळेच्या पटांगणात आठवडी बाजार भरवण्यात आला यावेळी पालकांसह नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
या बाल बाजाराचे उद्घाटन श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या सचिव अॅड. सौ.मधुबाला भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी बीआरसीच्या सौ .दमयंती कुंभार , सौ. राजस भोईटे , संचालक संदीप जगताप , प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य नाझनीन शेख, मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता.
शाळेमधील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला मुलांनी आपापल्या शेतातील आणलेली भाजीपाला कांदे ,बटाटे ,हिरवी मिरची ,कोथिंबीर मटकी वांगी टोमॅटो पालक मेथी गवार यासह खाद्यपदार्थांपैकी भेळ वडापाव बिस्किट पाणीपुरी, फळे आणि पदार्थ विक्रीसाठी आणलेले होते. परिसरातील नागरिकांनी खरेदीसाठी मोठी खरेदी केली होती.
No comments