Breaking News

मलठण येथील राष्ट्रवादीच्या २५-३० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

25-30 members of NCP from Malthan join BJP

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ -
मलठण मधील जिंतीनाका परिसर, सिद्धिविनायक मंदिर रोड व आईसाहेब नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख २५ ते ३० कार्यकर्त्यानी, आपल्या सहकाऱ्यांसह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, समशेरसिंह नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर व अशोकराव जाधव तसेच गोसावी समाजातील प्रमुख सुनिल घोलप, संदीप जाधव भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य व रमेश जाधव भाजप भटके विमुक्त आघाडी शहर अध्यक्ष व भरत जाधव, बाळासाहेब जाधव, संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.  जिंती नाका परिसरातील मनोज जाधव, धनंजय जाधव, पोपट जाधव, नेहाल जाधव, प्रदीप पाटोळे तसेच आईसाहेब नगर येथील विजय गिरी व सिद्धिविनायक मंदिर रोड येथील जयराम माळी, शिवाजी माळी, शहाजी माळी, पांडुरंग माळी, सुरेश माळी, अमर माळी, संदीप माळी, अजय माळी, भीमराव माळी, शंकर माळी, रंगराव माळी संदीप पोपट जाधव, सोमनाथ माळी, मनोज कुलकर्णी, प्रदीप पाटोळे, हनुमंत माळी या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रवेशानंतर माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी त्यांचे स्वागत करून, गोसावी समाजाच्या असणाऱ्या अडचणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन दिले. या वेळी फटाकड्यांचे आतशबाजित आनंद व्यक्त केला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, समशेरदादा, अभिजीत भैय्या यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

No comments