Breaking News

अवैध जनावरे वाहतुक तसेच बेकायदा कत्तल करणाऱ्या ३ जणांना केले २ वर्षे तडीपार

3 persons who were involved in illegal animal transport and illegal slaughter were deported for 2 years

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ जानेवारी -  फलटण तालुका परिसरात अवैध जनावरे वाहतुक तसेच बेकायदा कत्तल करणाऱ्या फलटण मधील एकुण ०३ जणांच्या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा व माळशिरस जि. सोलापूर, बारामती, पुरंदर जि. पुणे हद्दीतुन  दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.

     फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदा जानवरांची कत्तल करुन मासांची विक्री करणारे टोळी प्रमुख १) मुबारक हानिफ कुरेशी, वय ३३ वर्षे, तसेच टोळी सदस्य २) शाहरुख जलील कुरेशी, वय ३० वर्षे, ३) आजिम शब्बीर कुरेशी, वय ३४ वर्षे, सर्व रा. कुरेशीनगर मंगळवार पेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा यांच्यावर सातारा जिल्हयामध्ये टोळीने बेकायदा जनावरांची वाहतुक करुन, कत्तल व मांस विक्री करणे बाबतचे गुन्हे सातत्याने करीत असल्याने, फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हा, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.

    यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनवर आल्यानंतर, त्यांच्यावर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही, अगर त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन, ते सातत्याने गुन्हे करीत होते. तसेच त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहील्याने, त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा गुन्हेगारांवर जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

    वरील टोळीला मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हा, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

    नोव्हेंबर २०२२ पासुन १५ उपद्रवी टोळयांमधील ४९ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

    या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आँचल दलाल मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाणेचे पोहवा अशोक वाडकर, यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

No comments