भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ सापडला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ - जमीन मोजणी केल्यानंतर मोजणीची हद्द कायम करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालय फलटण येथील कनिष्ठ लिपिक मुलाणी यांना (एसीबी) लाच लचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्या पथकाने, सापळा रचून रंगेहात पकडले असून, मुलाणी यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसेवक इब्राहीम मोहम्मदशफी मुलाणी वय ४९ वर्षे, नोकरी- कनिष्ठ लिपीक ता. भुमी - अभिलेख, फलटण जि. सातारा वर्ग- ३ मुळ रा. हिरवे बुद्रुक ता. जुन्नर जि. पुणे सध्या रा. खेड जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तक्रारदार यांचे मौजे कोरेगाव तालुका फलटण येथील वडिलोपार्जीत एकत्रीत असलेल्या गट नं.९० ची दि.१७/०१/२०२४ रोजी मोजणी करून सदर मोजणी हद्द दि.२९/०१/२०२४ रोजी कायम करण्याकरीता दहा हजार रूपये लाचेची मागणी करून, त्यातील सात हजार रुपये रक्कम मौजे कोरेगाव ता. फलटण येथील तक्रारदार यांच्या मोजणी गटाच्या शेजारी स्वीकारली असताना, एसीबी पथकाने मुलांनी यांना सापळा लावून रंगेहाथ पकडले आहे.
No comments