Breaking News

श्री देवांग कोष्टी समाज ट्रस्ट़, फलटण ची वार्षिक सभा संपन्न ; अध्यक्षपदी किशोर तारळकर तर उपाध्यक्षपदी गोकुळ बाबर

Annual meeting of Shree Devang Koshti Samaj Trust, Phaltan concluded; Kishore Taralkar as President and Gokul Babar as Vice President

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   श्री. चौंडेश्वरी देवीचा उत्सव (शाकंभरी पोर्णिमा) पौष पोर्णिमा या वर्षी दि. २५ जानेवारी २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या श्री. देवांग कोष्टी समाज ट्रस्ट फलटण ची वार्षिक सभा संपन्न झाली. 

    या वार्षिक सभेमध्ये सन २०२४ सालाकरिता सभेस उपस्थित असलेल्या कोष्टी समाजातील सर्व बांधवांनी एकमताने नविन कार्यकारी मंडळाची नियुक्ती केली. श्री. देवांग कोष्टी समाज ट्रस्ट, फलटणच्या अध्यक्षपदी श्री. किशोर प्रल्हाद तारळकर व  उपाध्यक्षपदी श्री. गोकुळ दशरथ बाबर यांची निवड करण्यात आली.

    सदस्यपदी श्री. अनंत वाडकर, श्री. सचिन तारळकर, श्री. रविंद्र उणवणे, श्री. प्रदिप भरते, श्री. योगेश डोईफोडे, श्री. नंदकुमार गजफोडे श्री. प्रविण डोईफोडे, श्री. रविंद्र लिपारे, श्री.अनुप भागवत, श्री. शरद म्हेत्रे, श्री. अशोक डोईफोडे, श्री. संदिप कुमठेकर, श्री. संतोष डोईफोडे, श्री. पवन भागवत, श्री. सुरेश डोईफोडे, श्री. अमित कुरकुटे, श्री. विनय कुमठेकर यांची निवड करण्यात आली. 

    या सभेमध्ये दि. २५ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या श्री. चौंडेश्वरी  देवीच्या उत्सवाचे नियोजन करण्यात आले. तसेच  देवीचा उत्सव दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी  मोठ्या उत्साहाने व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याचा मानस अध्यक्षांनी  व उपाध्यक्षांनी बोलून दाखवला.

No comments