अजिजभाई शेख यांचा भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - शुक्रवार पेठ, फलटण भागातील सामाजिक कार्यकर्ते अजिजभाई शेख यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, प्रभाग क्रमांक १० व ११ मधील विकास कामे व्हावीत म्हणून, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले. यावेळी अनुप शहा, सुनील पवार, लक्ष्मण शिंदे, महिला मोर्चाच्या पदाधिकारी सौ उषा राऊत, सौ विजया कदम, सौ रणवरे इत्यादी उपस्थित होते.
No comments