Breaking News

फलटण येथे भीमा कोरेगाव शौर्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

Bhima Koregaon Shaurya Day is celebrated with great enthusiasm at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेने फलटण येथे १ जानेवारी २०२४ रोजी शौर्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.  यावेळी भीमा कोरेगाव येथील विजय स्थंभाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.  
यावेळी विजय स्तंभाला सलामी देऊन मानवंदना देण्यात आली व  बुद्ध वंदना घेण्यात आली.  या वेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष सनी कदम तसेच इतर पदाधिकारी व सभासद उपस्थीत होते.

No comments