लक्ष्मीनगर फलटण येथे घरफोडी ; सोन्या - चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - लक्ष्मीनगर, फलटण येथील बंद फ्लॅटच्या सेफ्टी डोअर व दरवाजाची कडी कापून, घरातील २ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक चांदीचा छल्ला व पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण ५४ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मीनगर, फलटण येथील शुभश्री अपार्टमेंट येथे बनकर कुटुंबीयांचा फ्लॅट आहे. बनकर दाम्पत्य मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत, अज्ञात चोरट्याने, दिनांक १३/१/२०२४ रोजी पहाटे ५ वाजता ते दिनांक २२/१/२०२४ रोजी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान बनकर यांच्या लक्ष्मीनगर, फलटण येथील फ्लॅटचे सेफ्टी डोअरचा कोयंडा कशानेतरी कापुन, आतील दरवाजाचा कोयंडा तोडून, घरात प्रवेश करून, घरातील कपाटातून १) ५०००/- रु किंमतीच्या एक तोळा सोन्याच्या रिंगा (२५ वर्षापुर्वीच्या) २) २०००/- रु किंमतीच्या दोन ग्रॅम सोन्याच्या रिंगा ३) ४०,००० /- रु किंमतीची दोन तोळा वजनाची गळ्यातील चैन व त्यामध्ये स्वास्तीकचे बदाम ४) २०००/- रु किंमतीचा एक चांदीचा छल्ला ५० ग्रॅम वजनाचा, ५) ५००० रु. रोख रक्कम असा एकूण ५४ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद डॉ. हेमलता चंद्रकांत बनकर रा. लक्ष्मीनगर फलटण यांनी दिली आहे.
No comments