Breaking News

फलटण एसटी बस स्टँड येथून साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला

Gold ornaments worth five and a half tolas and cash were stolen from Phaltan ST bus stand

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ -  फलटण एस टी स्टँडवर, बस मध्ये चढत असताना, प्रवासी महिलेच्या पर्समधून  साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५००० रुपये असा एकूण ६१ हजार ४०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २६/१२/२०२४ रोजी सकाळी टिटेघर ता. भोर येथुन ताथवडा ता. फलटण जि.सातारा येथे जाण्यासाठी दळवी दाम्पत्य निघाले होते. ते दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास फलटण एस टी स्टँड येथे उतरले, त्यानंतर १ वाजता  बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सौ. शोभा दळवी यांच्या पर्समध्ये ठेवलेले, १) २६००० रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण २) १५,४०० रुपये किंमतीचे सव्वा दोन तोळ्याची सोन्याची चैन ३) १५००० रुपये किंमतीचे अर्धा तोळा वजनाची सोन्याची चैन ४) ५०००/- रु. रोख रक्कम असा एकूण ६१ हजार ४०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला असल्याची फिर्याद सौ. शोभा चंद्रकांत दळवी वय-६२वर्षे,  रा. टिटेघर ता. भोर यांनी दिली आहे.

No comments