हरीष काकडे यांची राष्ट्रवादी काॅंग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - विधान परिषदेचे मा.सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासु कार्यकर्ते हरिष काकडे उर्फ आप्पा यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदी करण्यात आली आहे.
दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी हरिष काकडे यांना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते देवगिरी या निवासस्थानी नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, फलटणचे मा.नगरसेवक सनीदादा अहिवळे, कामगार संघटणेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सनी काकडे, उद्योजक राकेश जगताप व ईतर कार्यकर्ते ऊपस्थित होते.
No comments