दि.८ रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये 'महास्वच्छता अभियान' ; अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ जानेवारी - सोमवार दि. ८/१/२०२३ रोजी सकाळी ८ ते १२ वाजता फलटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 'महास्वच्छता अभियान' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उदेश गावातील सर्वत्र पडलेला कचरा गोळा करने, तसेच गावच्या बाहेर रस्त्याच्या कडेला जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वेलाईन, बसस्थानके, शहर लगतच्या राष्ट्रीय / राज्य मार्गाच्या जागा, धार्मीक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालये, आरोग्य संस्था, शाळा व महाविद्यालये त्यांचा परिसर इ. ठिकाणाची स्वच्छता करण्यासाठी राबवण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी दिली आहे.
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अभियानामध्ये गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य ,ग्रामसेवक ,शिक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय विद्यार्थी,शासकीय व निमशासकीय कर्मचारी, ग्रामस्तरीय स्वयंसेवी संस्था व इतर यांच्या सर्वांमार्फत हे अभियान राबवण्यात येणार आहे.
गावची स्वच्छता शाश्वत राखण्यासाठी जे नागरीक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करतात, रस्त्याच्या व गावच्या सार्वजनिक ठिकाणी कचरा / प्लॅस्टीक टाकतात व गावत घाणीचे साम्राज्य निर्माण करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकारी पदाचे संपर्क अधिकारी नेमलेले आहेत. हे अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात जाऊन सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत, तरी सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी करू नये व आपल्या गावात स्वच्छता राखून प्रशासनास सहकार्य करावे.
No comments