मुधोजी महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा फडतरवाडी येथे शुभारंभ
![]() |
शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना आमदार दिपकराव चव्हाण व उपस्थित मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर , शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर व फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित मुधोजी महाविद्यालय वरिष्ठ व कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वच्छ भारत आणि विकसित भारत अभियान प्रेरीत" या घोष वाक्याखाली तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी व सेवाभाव निर्माण करण्यासाठी मौजे फडतरवाडी तालुका फलटण येथे दि. १० जानेवारी पर्यंत विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
या शिबिराचे उद्घाटन गुरुवार दिनांक ४ जानेवारी रोजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले. मुधोजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. वेदपाठक सर यांनी प्रस्ताविक करताना शिबिराचे नियोजन व महत्व सांगितले.
प्राचार्य डॉ. पी.एच. कदम यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना, शिबीरार्थींचा दररोजचा दिनक्रम सांगितला. या प्रसंगी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय दिक्षित , फडतरवाडी गावच्या सरपंच सौ. पौर्णिमा काटे , उपसरपंच श्री. अमोल फडतरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात अनेक प्रबोधन पर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये शुक्रवार दिनांक ५ जानेवारी रोजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी व्यक्तिमत्व विकासावर , शनिवार दिनांक ६ जानेवारी रोजी सरोज बडगुजर यांनी "शून्य कचरा व्यवस्थापन" यावर व्याख्यान दिले.तसेच याच दिवशी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मौजे फडतरवाडी गावचे सरपंच व उपसरपंच यांनी उपस्थित पत्रकार यांचा सत्कार केला.
या शिबिराचा समारोप समारंभ बुधवार दि. १० जानेवारी रोजी माननीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.या शिबिरात अनेक सामाजिक सांस्कृतिक समाज प्रबोधन पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या विशेष श्रमसंस्कार शिबिरास फलटण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शिबिरार्थींना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करण्याचे आव्हान मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य , उपप्राचार्य, कार्यक्रमाधिकारी प्रा.सौ. एन.डी. देशमुख , प्रा.डॉ. ऍड . ए.के. शिंदे , सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री.एम .एस. शिंदे व प्रा. एस.एस. लवांडे यांनी केले आहे.
Post Comment
No comments