काळज येथे सुरू असलेल्या निरा देवघर कालवा कामाचा खा. रणजितसिंह यांच्याकडून आढावा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २८ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते निरा-देवघर कालवा प्रकल्पाचे भूमिपूजन काळज ता. फलटण येथे १७ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात करण्यात आले. त्यानंतर कालव्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी २७ जानेवारी २०२४ रोजी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. कालव्याचे काम अतिशय जलद गतीने चालू असून, फक्त दहा दिवसांमध्ये जवळपास ४ किलोमीटर चे काम झाले. यावेळी निरा देवघर कालवा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे अशा सूचना खा. रणजितसिंह यांनी दिल्या.
निरा-देवघर कालवा कामास भेट दिली त्याप्रसंगी अमरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, लतिफभाई तांबोळी, राजेंद्र काकडे, मनोज कांबळे, अमित रणवरे, सागर शहा, ॲड. जयंत काकडे, संजीव झणझणे, ऋतुराज काकडे, संदिप अनपट,विशाल जगताप,प्रसाद अनपट व निरा-देवघर, धोम-बलकवडीचे अधिकारी उपस्थित होते.
No comments