महाराष्ट्र हॉकी संघाच्या कर्णधारपदी फलटणची अनुराधा ठोंबरे
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) - कर्नाटक येथील बेंगळूरु मधील कोडगू येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची कु. अनुराधा ठोंबरे ची महाराष्ट्राच्या संघाची कर्णधारपदी निवड करण्यात आली असून. पुणे (बालेवाडी) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही निवड करण्यात आली होती. तसेच मुधोजी हायस्कूलच्या कु. अनुष्का केंजळे व शिफा मुलानी या दोन खेळाडूंचा ही महाराष्ट्राच्या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धा गुरुवार दिनांक ४ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये बेंगळूरू (कोडगू) येथे संपन्न होत आहेत. निवड झालेल्या वरील खेळाडूंना महाराष्ट्राचे जेष्ठ हॉकी कोच तथा तालुका क्रीडाधिकारी (नि.) महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज चे क्रीडा मार्गदर्शक एन आय एस कोच सचिन धुमाळ, टिम मॅनेजर बंडू खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक शिक्षिका धनश्री क्षिरसागर व वरिष्ठ खेळाडू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्राच्या हॉकी संघा मध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शक शिक्षक यांचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, सदस्य श्री महादेव माने प्रशासनाधिकारी अरविंद निकम, प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य देशमूख ज्ञानदेव, पर्यवेक्षक शिंदे व्ही. जी., जाधव जी.ए., पर्यवेक्षिका सौ. सुनिता माळवदे, क्रीडा समितीचे सर्व सदस्य व फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, फलटणकर हॉकी प्रेमी, आजी - माजी हॉकी खेळाडू व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments