अनामिका लक्ष्मण धनावडे हिची राज्यस्तरीय खो - खो अजिंक्य स्पर्धेसाठी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मुधोजी महाविद्यालय, फलटण कनिष्ठ विभागाची खो - खो खेळाडू कु. अनामिका लक्ष्मण धनावडे इ.१२ वी. आर्ट्स हिची नंदुरबार येथे होणाऱ्या ४९ व्या कुमार - कुमारी राज्यस्तरीय खो - खो अजिंक्य स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस.आर.वेदपाठक सर व सर्व प्राध्यापकवृंद यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
No comments