Breaking News

शशिकांत सोनवलकर यांना राज्य स्तरीय विशेष दर्पण पुरस्कार प्रदान

 

State Level Special Darpan Award given to Shashikant Sonwalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिल्या जाणाऱ्या दर्पण पुरस्काराचे वितरण  करण्यात आले.पोभूर्ले जि. सिंधुदुर्ग येथील आचार्य बाळशास्री जांभेकर दर्पण सभागृहात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दुधेबावी ता. फलटण येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत पांडुरंग सोनवलकर यांना राज्यस्तरीय विशेष दर्पण  पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

    सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ, ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.सिधुदुर्ग जिल्याचे जिल्हाधिकारी  किशोर तावडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री,ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर,  यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होते.

No comments